होळी
Raj Dhutraj 1 march 2018 | मराठी सण | 3
देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात.
फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसर्या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात या उत्सवाला आपण होळी म्हणतो.
या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठवुन टाकणार्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणार्या अग्नीला कृतज्ञतापुर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत.
आजच्या लोकोत्सव “होलिकोत्सव(होळी)”, “धूलिकोत्सव” (धूळवड) आणि “रंगोत्सव” (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव जर करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावानं “शिमगा” करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.

Comments
Post a Comment