Skip to main content
बुध्दांना एका पंडितन विचारल की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.

🌸बुध्द म्हणाले , तुम्हाला आसे कुणी सांगितले की मी आसे बोललो?

पंडित म्हणाला, नाही आसे कुणी सांगितले नाही .

🌸मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का ?

पंडीत म्हणाला नाही.

🌸मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ?

पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चे तून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?

🌸तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .

पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .

🌸मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो

 १)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा

माणूस डोळ्यान बघतो,
कानान आवाज ऐकतो,
नाकान वास घेतो,
जीभेन चव घेतो,
आणि त्वचेन स्पर्श जाणतो .

या पंच ज्ञानेंद्रीयान पैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो .

पंडित विचारतो कसे ?

🌸पाणी डोळ्यान दिसत पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते .
गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .

पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?

🌸तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?

पंडित म्हणाला नाही.

🌸याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?

पंडित म्हणाला नाही .

🌸हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही , आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.

तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?

पंडित म्हणाले नाही .

🌸तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?

पंडित- नाही.

🌸तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?

पंडित- नाही.

🌸मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?

पंडित - नाही.

🌸मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही .
आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही. त्याचा उपयोग नाही.

ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला…
तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?

🌸तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .

पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.

🌸मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?

पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .

🌸मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?

पंडित - आत्मा शरीर सोडतो.

🌸का सोडतो आत्मा शरीर ?
कंटाळा आला म्हणून ?

पंडित- माणसाच आयुष्य संपल्यावर.

🌸तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .
अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,

पंडितजी - तथागत बरोबर आहे तुमच . पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?

🌸तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड , भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता . बरोबर ?

पंडित - बरोबर .

🌸मग मला सांगा वात कधी विझते ?

पंडित -तेल संपत तेंव्हा .

🌸तथागत - आणखी ?

पंडित - तेल आहे पण वात संपते तेंव्हा.

🌸तथागत- आणखी ?

पंडितजी काहीच बोलले नाहीत.

🌸तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला , पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा . आणि जीव म्हणजे आग (उर्जा )
सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .

१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती)
२) आप - द्रवरुप पदार्थ (पाणी , स्नीग्ध तेल )
३) वायु - वारा
४) तेज -उर्जा, उष्णता
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनण थांबते .
यालाच म्हणतात माणूस मरणे .
आणि
सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .
देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .
*धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसान कस जगाव याच मार्गदर्शन करतो.*
*काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो.*
*धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो .*

अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.
जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे .

Forward to your groups and people..

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...