Skip to main content
दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.

 डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थोमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !

 केरळमद्धे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामद्धे राहून तिने एमटेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तीचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमद्धे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाउन पोहोचल्या.तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख " अग्निपुत्री " म्हणूनही झाली.

 आज ४९ वर्षे वय असलेल्या ट्रेसी थोमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यानाही रोजच करावी लागते. २४ तासामद्धे कोणत्याही क्षणी कामावर हजार राहावे लागत असूनही आपल्या हाताने बनविलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. कदाचित त्यासाठी सैफ आली खान नावाचा तद्दन भिकार अभिनेता अधिक लायक ठरत असावा.

 मैत्रिणीनो, टेसी थोमस यांची कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आणि आजही महिलांना " पानी कम " समजणाऱ्या फेसबुकवरील असंख्य महाभागांना एक सणसणीत चपराक ठरावी ज्यांनी महिलांना अनेक वेळा नाउमेद करून पाय खाली खेचायचा प्रयत्न केला. आज इस्रोमद्धे तब्बल बाराशे महिला शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही.

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...