पोलखोल संघाची.नक्की वाचा.
श्रीमंत कोकाटे
अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे?
संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या आहेत.
संघातून आलेले लोक शिवाजीराजांवर जाणिवेतून कितीही बढाया मारत असले तर त्यांच्या नेणिवेत काय कचरा भरलेला असतो तो छिंदमसारख्याच्या मुखातून कधीतरी बाहेर पडतोच,प्रमोद महाजन केंद्रीय मंत्री असताना म्हणाले होते “आमची सत्ता संपूर्ण देशभर आहे शिवाजीराजांचे राज्य फक्त साडेतीन जिल्ह्यापुरते होते”. यातून यांना शिवरायांबाबत किती घृणा आहे हे स्पष्ट होते.एका बाजूला मतांसाठी शिवाजीराजांचे नाव घ्यायचे आणि सत्ता आली की त्यांचा द्वेष करायचा ही त्यांची वृत्ती आहे.
वि दा सावरकर म्हणाले होते “शिवाजी कसला राजा हा तर काकतालीय न्यायाने झालेला राजा होता”.सावरकरांना मौर्याची सत्ता नष्ट करणारा पुष्यमित्र शुंग, पेशवे महान वाटले पण शिवाजीराजे दखलपात्र वाटले नाहीत. लेन आला आणि शिवाजीराजांची बदनामी करून गेला, असे घडले नाही तर राजवाडे, पुरंदरे, बेडेकर इत्यादी मंडळींनी शहाजीराजाना सतत गैरहजर दाखवणे आणि रामदास- कोंडदेव यांना गुरु नसताना सतत शिवबा- जिजामातेशेजारी दाखवणे हे काम केलेले आहे.पुरंदरेंनी तर “दादोजी,जिजामाता आणि शिवबाचे गोत्र एकच होते” अशी कल्पनाविस्तारीत विकृती त्यांच्या ग्रंथात लिहिली. पुरंदरचे हे वाक्य छिंदमइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक बदनामीकारक आहे. लेनच्या पुस्तकाची पाळंमुळं पुरंदरेंच्या विकृत लिखाणात आहेत.संघीष्टांच्या मनात असणारी विकृती कधी लेनद्वारे तर कधी छिंदमद्वारे बाहेर पडते.
लेनच्या पुस्तकावर बंदी घालू नये असा सल्ला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी दिला,पण शिवप्रेमींच्या उद्रेकानंतर त्यांनी घुमजाव केले.असाच सल्ला एका ज्येष्ठ पुरोगामी संपादकानेदेखील दिला होता. लेनला मदत करणारी जी मांदियाळी आहे त्यात अनेक संघी आहेत. त्यात माधव भंडारी देखील आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्या.पी बी सावंत,ज्ञानपीठक प्राप्त साहित्यिक डॉ भालचंद्र नेमाडे, जितेंद्र आव्हाड, डॉ प्रकाश आंबेडकर, ज्ञानेश महाराव ,प्रा प्रतिमा परदेशी इत्यादींनी व संपूर्ण महाराष्ट्राचा विरोध असताना देखील देवेंद्र फडणवीस-विनोद तावडे यांनी पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.आता तर पुरंदरेंच्या शिवसृष्टीला ३०० कोटी रुपये फडणवीस सरकारने मंजूर केलेले आहेत. म्हणजे हे जिजाऊंची बदनामी केल्यामुळे पुरंदरेंना बक्षीस दिले काय? असा प्रश्न पडलेला आहे.
योगेश उपासनी नावाच्या व्यक्तीने बीड येथील सावरकर कॉलेजात “शिवरायांना चापटा मारायला हव्यात” असे वक्तव्य केले होते.तेंव्हा संतप्त तरुणांनी कॉलेजची तोडफोड केली होती.ते उपासनी आता कीर्तनकार बनून महाराष्ट्रात फिरतात.म्हणजे छिंदम एकटा नाही हा एक संघटित विकृतीचा परिपाक आहे.
बहुजन समाजाला नाउमेद करण्यासाठी त्यांच्या महापुरुषांची बदनामी करणे,स्त्रियांचे चारित्र्यहनन करणे ,हा यांचा सनातनी धंदा आहे वेद पुराणात माहिलांबद्धल किती बदनामीकारक लिहिले आहे, याचा समाचार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कॉ शरद पाटील आणि डॉ आ ह साळुंखे यांनी घेतला आहे महिला ही सेवेसाठी व उपभोगासाठीच आहे हे पुराणांनी लिहिले आहे मत्सपुराण तर म्हणते “उपवर झालेल्या मुलीचा उपभोग घेण्याचा पहिला मान भटासाठी असतो” तर अथर्ववेदात लिहिले आहे की” एखादी स्त्री जर ब्राह्मणाला आवडली आणि त्याने जर तिचा हात धरला तर ती त्याची अधिकृत बायको होते,ती विवाहित असली तरी, हे सत्य आहे हे सांगण्यासाठीच सूर्य रोज उगवतो” या विचारांचे राज्य संघ भाजपाला आणायचे आहे. याचा अभिमान आपण बाळगणार का? त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते पुराणं म्हणजे शौचकूप आहेत. या शौचकूप
वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...
Comments
Post a Comment