ँ** वयाच्या २९ व्या वर्षी घरदार सोडून
* सहा वर्षे अरण्यात तपस्या करणार्या
* सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला.
* तो आजवरचा सर्वर्शेष्ठ शोध आहे.
*"जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला.
* तेंव्हा दोन विचारधारा प्रमुख होत्या_
१.* एक म्हणजे 'खा, प्या, मजा करा'
असाटोकाचा भोगवाद_
२.* दुसरा प्रकार म्हणजे शरीराला
* आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या
* सांगणारा वैराग्य मार्ग_
* "गौतम बुद्धांनी या दोन्ही मार्गांना
* त्यागून मध्यम मार्ग शोधला.
* ज्याला 'सम्यक संबोधी'
* असे म्हटले गेले."_
* सिद्धार्थ गौतमाला मानवी दु:खाचे
* मूळ कारण सापडले.
* त्या दुःखाच्या निवारणाचा मार्ग सापडला.
* ज्याला चार *'आर्यसत्य'*
* असे म्हटले आहे.
१.*"पहिले सत्य म्हणजे जगात दु:ख आहे."_
२.* "दुसरे सत्य त्या दु:खाला काहीतरी
कारण आहे,"_
३.* "तिसरे सत्य त्या कारणाचे
निवारण करता येते,"_
४.* "आणि चौथे सत्य त्या दु:खाचे
* निवारण करण्याचा मार्ग आहे."_
* त्या दुःख निवारण करण्याच्या मार्गाला
* गौतम बुद्धांनी *'आर्य अष्टांगिक मार्ग'*
* असे म्हटले आहे.
* आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ अंग
* असलेला मार्ग होय.
* ज्याच्याप्रमाणे आचरण
* केले तर तुमचे दु:ख समूळ नष्ट होते.
* दु:ख आणि दु:खाचे निवारण यालाच
* गौतम बुद्धांनी प्राधान्यक्रम दिला.
* गौतम बुद्धांनी
* निरर्थक गोष्टीवर कधीच भाष्य केले नाही"
* "बुद्धांनी दु:खाची व्याख्या केली आणि या
* दु:खापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी
* आर्य अष्टांगिक मार्ग दिला.
* या मार्गाचे तीन भागात
* विभाजन केलेले आहे.
१.* "पहिला भाग आहे *'शील'*,
२.* "दुसरा *'समाधी'* आणि
३.* "तिसरा *'प्रज्ञा'.*
१.* शील म्हणजे नियम._
* "समाजात कसे वागावे याचे नियम.
* समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी.
* जिचा मूलाधार हा _न्याय, समता,
* व्यक्तिस्वातंत्र्य, आणि समान संधी हा
* असेल._
* शील पालनाचा आणि मनाचा खूप
* जवळचा संबंध आहे कारण मनावर ताबा
* असला तरच शील पाळता येते.
* एखाद्दा व्यसनाधीन माणसाला व्यसनाचे
* दुष्परिणाम चांगले ठाऊक असतात.
* व्यसनातून बाहेर
* पडावे असे त्याला वाटत असते.
* पण मनावर ताबा नसल्यामुळे तो
* परत-परत
* त्या चक्रात अडकत जातो.
२.* मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम
* बुद्धांनी समाधीचा पुरस्कार केला._
* अशी समाधी शिकवली जिचा मूलाधार
* निसर्गनियम आहे.
* श्वास आणि संवेदनेवर आधारित साधना
* शिकवली.
* जी साधना कोणताही माणूस
* सहज करू शकतो.
* त्याला कसलाही अडथळा येत नाही.
* श्वास आणि शरीरावर
* होणार्या संवेदनांचे निरीक्षण करायला
* कसली आलीय अडचण.
* त्यातून मन एकाग्र
* होते आणि मनावर ताबा येतो. "
३.* शील आणि समाधीच्या अभ्यासातून प्रज्ञा
* विकसित होते.
* प्रज्ञा म्हणजे ज्ञान._
* असे ज्ञान ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध
* होतो आणि दु:खाचे कारण दूर केले की
* दु:ख दूर होते.
* माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे.
* मीच ते निर्माण केले आहे.
* आणि मलाच ते दूर करावे लागेल.
* याचा बोध त्याला होतो.
* आणि तो कार्यशील होतो.
* ज्या माणसाला हे तत्त्व समजले.
* ज्याने याचा अनुभव घेतला तो निरर्थक
* गोष्टीत रमत नाही.
* मी या मानव समाजाचा एक घटक आहे.
* आणि हा समाज सुखी असला तरच
* मी सुखी राहीन.
* ही भावना त्याच्यात वाढीस लागते.
* मग आपोआपच जातीची बंधने तुटू
* लागतात.
* वैरभाव दूर होऊ लागतो".
* "गौतम बुद्धांनी म्हटले आहे-
* 'न हि वेरेन वेरानि,सम्मन्तीध कुदाचनं।
* अवेरेनच सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो "
* म्हणजे वैर वैराने शमत नाही
* ते अवैरानेच संपते.
* या अवैराच्या विचारातून सर्वांबद्दल
* प्रेम, मैत्री आणि सद्भाव वाढू लागतो.
* यातूनच करुणेचा उदय होतो.
* ही मैत्री करुणाच सामाजिक स्वास्थ्य
* वाढविते.
* मैत्री आणि करुणा हा बुद्धविचाराचा
* स्थायीभाव आहे.
* ते मानवी मनाचे टॉनिक आहे._
* विशेष म्हणजे ते सर्वत्र लागू होणारे आहे.
* त्याला स्थळ-काळाचे बंधन नाही.
* त्यात काळानुरूप बदल करण्याची
* गरज नाही.
* "पंचशील २५०० वर्षांपूर्वी आवश्यक होते,
* आजही ते तितकेच आवश्यक आहे,
* उद्याही ते तितकेच महत्त्वाचे राहणार
* आहे."_
* बुद्धविचार काळाच्या कसोटीवर
* खरा ठरला आहे.
वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...
Comments
Post a Comment