Skip to main content
जसं सूर्याला प्रकाश दाखवणं. आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघट आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत_

*- जितेंद्र (अभिनेता)*

🌈_बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला._

*- थनसक पुमपेच (थायलंडचे मेजर जनरल)*

🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते._

*- अरविंद केजरीवाल*

🌈_भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात._

*- विजयादा राजपक्षे (श्रीलंकेचे मंत्री)*

🌈_तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला._

*- बराक ओबामा, भारतीय संसद, २०१०*

🌈_डॉ. आंबेडकरांची राष्ट्राला खरी गरज आता आहे - तीही शीघ्रतेने._

*- अरुंधती रॉय*

🌈_महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली._

*- जब्बार पटेल*

🌈_राज्यघटनेला ५० वर्ष पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लडचे सर्वोच्च न्यायाधिश होते. चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षर सुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते_

*- जब्बार पटेल*

🌈_डॉ. आंबेडकर हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहीत आहे._

*- एक युरोपीयन प्रवासी, ७ नोव्हेंबर १९३१*

🌈_डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे._

*- गव्हर्नर रिचर्ड कॅसे*

🌈 बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘या युगातील भगवान बुद्ध’ आहेत.

*- महास्थविर चंद्रमणी*

🌈_डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरूषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते ?_

*- माईसाहेब डॉ. सविता आंबेडकर*

🌈_डॉ. आंबेडकर हे एकटेच ५०० ग्रज्युएटांच्या बरोबरीचे आहे. स्वत:च्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे की ते ह्या विद्वत्तेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात._

*- जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगो*

🌈_डॉ. आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत._

*- राममनोहर लोहिया*

🌈_डॉ. आंबेडकरांमध्ये तुम्हाला (अस्पृश्यांना) तुमचा उद्धारकर्ता लाभला आहे. हे तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे._

*-छ. शाहू महाराज, माणगांव परिषदेत, मार्च १९२०*

🌈_डॉ. आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाता आहेत._

*- सयाजीराव गायकवाड*

🌈_डॉ. आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत._

*- डॉ. बेव्हरले निकोल्स*

🌈_जगात सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत._

*- एक युरोपीयन*

🌈_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखिल कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक ह्यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीण ऋषीपेक्षांहीलश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. 

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...