Skip to main content
*संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार : -*

*१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.*
                ---------  *संत ज्ञानेश्वर*


*२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.*
                --------- *संत ज्ञानेश्वर*

*३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.*-------
                  *संत ज्ञानेश्वर*

*४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.*
                  --------- *संत ज्ञानेश्वर*

*५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.*
                 --------- *संत ज्ञानेश्वर*

*६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.*
                   ---------  *संत ज्ञानेश्वर*

*७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !*
                  ---------  *संत ज्ञानेश्वर*

*८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.*
                    --------- *संत ज्ञानेश्वर*

*९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.*
                ---------  *संत ज्ञानेश्वर*

*१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.*
                   ---------  *संत ज्ञानेश्वर...*

    *🙏🏻 रामकृष्ण हरि 🙏🏻*Www.rajdhutraj3068.blooger.un

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Wikipedia Rajratan Dhutraj

Wikipedia ... Rajratan Dhutraj  Rajratan Vitthal Dhutraj Dob.02/06/1991 Education. MA.ENGLISH                   B.ed  Adreess.Nanded Maharashtra India         9922648129 email. rajratandhutraj@gmail.com
होळी Raj Dhutraj 1 march 2018 | मराठी सण | 3 देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसर्‍या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात या उत्सवाला आपण होळी म्हणतो. या उत्...