Skip to main content
*☄शिक्षक,म्हणजे काय असतो,याचे ज्वलंत उदाहरण या कथेतुन वाचा !*
              *🔥कर्तव्य🔥*
       *बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.*
*"अरे ही चप्पल शिवायची आहे"*
     *समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.*
*"तुम्ही जोशी सर ना?"*
*त्याने विचारलं.*
*"हो.तू?"*
      *"मी गजानन.गजानन लोखंडे.झेड.पी.च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे."*
      *"बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" जोशी सर त्याला निरखत म्हणाले.*
      *"असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन"*
*"पण तू हा व्यवसाय का.....?"*
       *"सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय."*
*"काय झालं वडिलांना?*
       *"सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात"*
*"ओह!आणि तुझे भाऊ?"*
*"दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत.शिकताहेत.आई अशिक्षित."*
      *"अच्छा" ज़ोशी सर विचारात गढून गेले.गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.*
      *काही दिवसांनी ते परत आले.गजूला म्हणाले "अरे माझ्या मापाचा एक बुट तयार करुन देशील?"*
       *गजू तयार झाला.त्याने माप घेऊन दोन दिवसात तयार बुट करुन दिला.सरांना तो आवडला.त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले.गजूला खुप आनंद झाला.इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.*

       *आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले.सगळे जोशी सरांनी पाठवलंय असं सांगायचे.*
        *काही दिवसांनी सर आले.गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला.त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले "गजू तुझ्या हातात कला आहे.तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबुट ठेवले तर गिर्हाईकांना थांबावं लागणार नाही"*
       *" सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील.तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ"*
*"हरकत नाही.मी देतो तुला.पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे.चालेल?"*
        *गजू तयार झाला.आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली.महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला.जोशी सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले.त्यांनी ते त्याला परत केले.*
      *"मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती.सहा महिन्यानंतरच मला परत कर.तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर."*

         *गजूचा आता उत्साह वाढला.त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली.उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली.आता त्याला वेळ पुरेनासा झाला.*
       *सहा महिन्यांनी सर आले.गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.*
      *"सर खुप चांगलं चाललंय.पण आता पुढं काय करायचं"*
      *"गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं.तिथे हे सगळं शिफ्ट करायचं.मी पाहून ठेवलंय दुकान.अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.आणि हो!स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो.एम.आय.डी.सी.मध्ये फँक्टरी टाकून दे"*
      *"काय?फँक्टरी?"गजू थरारला"सर मला जमेल का?"*
        *"सगळं जमेल.मी आहे ना"सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.*
      *गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.*
*"सर खुप करताय माझ्यासाठी"*
       *"अरे ते माझं कर्तव्यच आहे"त्याला उठवत ते म्हणाले"माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत.कोणी इथे मोठे अधिकारी आहेत.तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?"गजूच्या डोळ्यात पाणी आलं.*

       *दोन वर्षात गजू खुप पुढे गेला.फँक्टरी वाढली.एकाची तीन दुकानं झाली.गजूचा गजानन शेठ झाला.झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के.फ्लँटमध्ये रहायला गेला.भाऊबहीणी चांगल्या शाळाकाँलेजमध्ये जाऊ लागले.दरम्यान त्याचे वडील वारले.वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं.मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता.काही दिवसांनी त्याची आई वारली.*
      *इकडे जोशी सरांना निव्रुत्त होऊन पाच वर्षे झाली होती.सर आता थंकले होते.त्यांच्या मुलाने इंग्लंड मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती.त्यामुळे सर दुःखी होते.त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.*

        *एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला.सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला.सरांची मुलगा,मुलगी वेळेवर पोहचू शकले न

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Wikipedia Rajratan Dhutraj

Wikipedia ... Rajratan Dhutraj  Rajratan Vitthal Dhutraj Dob.02/06/1991 Education. MA.ENGLISH                   B.ed  Adreess.Nanded Maharashtra India         9922648129 email. rajratandhutraj@gmail.com
होळी Raj Dhutraj 1 march 2018 | मराठी सण | 3 देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसर्‍या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी करतात या उत्सवाला आपण होळी म्हणतो. या उत्...