*☄शिक्षक,म्हणजे काय असतो,याचे ज्वलंत उदाहरण या कथेतुन वाचा !* *🔥कर्तव्य🔥* *बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.* *"अरे ही चप्पल शिवायची आहे"* *समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.* *"तुम्ही जोशी सर ना?"* *त्याने विचारलं.* *"हो.तू?"* *"मी गजानन.गजानन लोखंडे.झेड.पी.च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे."* *"बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" जोशी सर त्याला निरखत म्हणाले.* *"असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन"* *"पण तू हा व्यवसाय का.....?"* *"सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय."* *"काय झालं वडिलांना?* ...